हा पाऊस…
हा पाऊस…
मातीच्या हलक्या गंधातुन
मनी तरंग उठवुन जातो हा पाऊस….
उमेदिचे ढग गच्च काळे
नभात दाटवुन जातो हा पाऊस….
आस मायेची सरीतुनी
साऱ्या जगी पसरवतो हा पाऊस….
कष्टाच देवून सुख
पुंजी बळीराजाची वाढवतो हा पाऊस….
ong>थेंबा थेंबांच लेवून पैंजण धरनीमाईस हिरवा शालु नेसवतो हा पाऊस…. धुक्यांचा करून स्पर्श संथ मन प्रफुल्लीत करून जातो हा पाऊस…. मिसळुनी आसवात सारे दु:ख वाहुन नेतो हा पाऊस…. निसर्गाची दावुनी किमया गार वाऱ्यात विरून जातो हा पाऊस….