The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Nikita Gavli

Drama Tragedy

4.8  

Nikita Gavli

Drama Tragedy

दवडु नको वेळ...

दवडु नको वेळ...

1 min
184


रुसलायंस कारं बाबा?

का आनीक काय झालया?

अडचण काय हाय तुझी?

नेमकी तेचं कळनास झालया.

 

वाटलं व्हतं, 

तु अता तरी येशीन,

पर वाट तुला माझ्या गावची,

घावणा वाटतया.

 

पोटाला काडुन चिमटा,

म्या दिसं अता मोजतोया.

स्वागताला तुझ्या बगं…..

कशी ओसाड रानंबी सजलीया.

 

तुझ्या वाटकडं लावुन डोळं,

अता आसवंबी आटलीयात.

लै बोलायच हायं तुझ्या संगट,

जे सारं मनामंदी साटलया.

 

येवुन तु कोरड्या..

भुईचा श्रुंगार कर.

बहरु दे हरवळ समदी,

त्याचा शालु तिस नेसवं.

 

तुझ्या पाण्याच्या थेंबांच्या मोत्याचं,

पैजण घालं तीला.

भरलेल्या धान्याचा तु,

साज चढव तीला.

 

किती दिस अनीक अशी,

हुलकावणी देणार हायीस असा.

जगावं तरी कसं आम्ही,

अता तुच सांग रं राजा.

 

घाई करं….

अता दवडु नको वेळ.

विस्कटुन जाईन समदा,

हा आयुष्याचा खेळ…

हा आयुष्याचा खेळ.


Rate this content
Log in