जाता जाता एकचं मागणं
जाता जाता एकचं मागणं


स्वप्न एक पाहिलं,
सिमेवर जायचं.
भारतमातेच्या कुशीतलं,
सुख अनुभवायचं.
जीव घेऊन हातावर,
भरती मि सैन्यात झालो.
घेऊन शपत संरक्षणाची भारतीयांच्या,
कर्तव्यात रूजु झालो.
चढवली पहिल्यांदा,
वर्दी या देहावर.
ठेवले पाऊल पहिले,
थाटात या सिमेवर.
जेव्हा वेचुन मारला गनीम,
एक एक करत.
तेव्हा पराक्रमाचं मेडल,
माझ्या छातीवर चढलं.
होत अजुन जगायचं,
कारण होतं लढायचं.
भारतदेशाला माझ्या,
गनीमापासुन दुर ठेवायचं.
आले विरमरण,
हुतात्मा मि झालो.
ओठांवर होतं हसु,
जरी तिरंग्यात लपेटलं गेलं.
g> बाबा झाले अमर माझे, आज देशासाठी लढतं. सफल तो माझा जन्म, अशी माय माझी म्हणतं. मान उंचावली माझी, म्हणे बाप मि वाघाचा. धन्यवाद करी ती पाहुण, दागिणा विरपत्नीचा. डोळ्यात माझ्या नाही पाणी, नाही चेहर्यावर दु:ख. भारतमातेचे पाय माझ्या रक्ताने धुन्याचे, लाभले मला सुख. मन माझे संतप्त आहे, आहे खंत एक. धोक्याने घेतला जीव, मिळाली नाही संधी करण्यास दोन हात. स्वर्गाचा दिशेने, चढुन समाधानाची पायरी. निघालो मि माझ्या, आज अंतीम प्रवासास. देवाकडे जाता जाता एकचं मागणं, आणखी एक दे जन्म. गणिमास धुळ चारण्यास, पुन्हा एकदा तिरंग्यात लपेटुन जाण्यास.