भेट
भेट
आहे आशेचा किरण मनात तीव्र कुठेतरी
भेटशील आज ना उद्या जगाच्या पाठीवरी
हजारो प्रश्न विनाउत्तर आहेत माझ्या सामोरी
करशील का समाधान या प्रश्नांचं येऊन तू कधीतरी
आठवण तुझी बेचैन करते हृदयाला वरचेवरी
धूसर छबी तुझी अशावेळी उमटते बघ गाभारी
नयनांत प्रतिबिंब तुझे अस्पष्ट असले जरी
आसवांच्या रूपाने ओघळेल हळूच असेच केव्हातरी
स्वप्नेही होतात नाराज विरह हा टोचे खोलवरी
जपून ठेवली मीही आसवे तुझ्याचसाठी आजवरी
