STORYMIRROR

Pratibha Bilgi

Romance

3  

Pratibha Bilgi

Romance

तुझं ते हक्कानं रुसणं

तुझं ते हक्कानं रुसणं

1 min
187

तुझं माझ्यासाठी सुंदर नटणं

इशारे करून लक्ष्य वेधणं

कमरेला खेचून पदर साडीचा

जवळ येण्यास आव्हान देणं


माझं तुला क्षणभर सतवणं

राग तुझा अनावर होणं

भाव तुझ्या मनाचे जाणूनही

स्वतःवर मात्र ताबा ठेवणं


माथ्यावर केसाची बट रुळणं

पैंजनांचा आवाज कानी पडणं

तरीही प्रतिक्रिया न दर्शविता

माझं सहज कामात गुंतणं


तुझं चिडून निरखून बघणं

माझं सर्वस्वी दुर्लक्ष करणं

चुकवत माझ्या हृदयाचा ठोका

तुझं ते हक्कानं रुसणं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance