विरह सरता सरेना
विरह सरता सरेना
आहेस खूप दूर
डोळ्यांत साठतो पूर
कधी होईल भेट
भरून येई ऊर
जीवघेणा हा एकांत
भेटेना कुठेही निवांत
भटकते एकटी अनवाणी
शुष्क ओसाड माळरानांत
थकले आता तुजविण
गेलास स्वप्ने रंगवून
तुला जाणीव नाही
काढिते रात्र जागून
चाहूल तुझी लागेना
दाह हा सोसवेना
वेदना मुक्या झाल्या
विरह सरता सरेना

