STORYMIRROR

Shila Ambhure

Romance

3  

Shila Ambhure

Romance

अधीर मन

अधीर मन

1 min
8.6K


निघाले माहेरा

नवी मी नवरी

जरा बावरी

सासुरात.


हिरवा चुडा

लेऊनी शालू हिरवा

केसांत मारवा

सुगंधी.


होऊनी लगीन

झाले दोन दिस

जणू मोरपीस

फिरते.


ओढ माहेराची

माझे अधीर मन

शहारले तन

हळदीचे.


पाठराखिण ती

सखी माझी करवली

ऐटित मिरवली

सासरी.


थाट 'तिकडचा'

सांगेन मी सयांना

शेजारी बायांना

खुशीत.


दख्खनची राणी

धाव वेगे बाई

वाट आई

बघतसे.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance