मैत्री
मैत्री
तुझ्या आठवणींना किती मी साठवू
सांग ना आग सांग ना तुला किती मी आठवू
जीवाला जीव देणारी तुझी माझी यारी
त तर शिकवलीस ना मला दुनियादारी
म्हणायला आज तू खूपच लांब गेलीस
पण माझ्या मनामध्ये कायमच स्थान निर्
करून गेलीस
खूप छान होते तुझ्यासोबत घालवलेले मैत्रीपूर्ण क्षण
तुझी मैत्रीच होती माझ्यासाठी सर्वात मोठे धन
मग असो पंचपक्वानांताट किंवा असो न्याहरी
तुझ्यासोबत घालवलेले प्रत्येक क्षण होते सोनेरी
तुझ्या आठवणींनी भरलेल प्रत्येक पान मज वाटे रुपेरी
येताना ताऱ्यांच आता रूप घेवून ये
यावेळीस येताना मात्र आयुष्य तेवढ खूप घेवून ये
स्वप्नात भेट किंवा आतासत्यात भेट
यावेळेस अशी भेट की मनात घरकरून जाईल थेट
पण सखे या आयुष्यात मात्र तू पुन्हा मात्र एकदा नक्की भेट