अनामिक तरूणी
अनामिक तरूणी
1 min
14.9K
घेऊनी स्कूटर बाजारात
चाललो होतो झोकात
बायको बसलेली पाठी
होती धिप्पाड लाखात
दिसली अनामिक तरूणी
नार सुंदर, ती कामिनी
केस कुरळे, काळेभोर
ओळखीचे हसली पाहूनी
मी धावलो तिच्यासोबत
आम्ही गेलो दूर - दूर
ती मदमस्त हरिणीसारखी
केले प्रेम तिच्यावर भरपूर
तिच्या नजरेच्या कटाक्षात
सैलावला माझा तोल
तिच्याकडे बघता - बघता
होऊन गेला सर्वच झोल
माझी स्कूटर पडली खाली
जाडजूड पत्नी कोसळली
घरी जाताच विचारे जाब
रागात माझ्यावरच घसरली
असा उनाड हा वारा
गीत गातो हृदयातून
मार पडता बायकोचा
जागा झालो मी स्वप्नातून