लई भारी वाटतं...
लई भारी वाटतं...
अबोल तुझं हसणं
माझ्याकडे पाहणं
प्रेमाणं लाजणं
पाठमोरं बोलणं...
मनाला भिडतं
हृदयात बसतं
वाऱ्यासवे झुलतं
अंग अंग शहारतं...
तुझी ती लगबग
जीवाची तगमग
माझ्यासाठी झटपट
भेटण्याची खटपट...
सारंकाही भावतं
तुझ्याकडे धावतं
मनोमन भरतं
लई भारी वाटतं...
तुझं तसं येणं
बघून मला जाणं
तिरकं-तिरकं पाहणं
इशार्यानं खुनवनं...
स्वप्नात पण दिसतं
दिवसाही भासतं
तुझ्यात हरवतं
वेड्यागत होतं...