स्पर्श
स्पर्श
स्पर्शाने आज तुझ्या
अंग माझे शहारले
या काही क्षणात
अंगावर काटे आले
पहिली भेट तुझी
आजही आठवते
आठवणींना पुन्हा
कशी बघ ओलावते
बसलीस आज शेजारी
हाताला स्पर्श झाला
या कोमल स्पर्शाने
हृदयाचा ठोका चुकला
पहिल्या पावसात
अंगावर थेंब पडतो
स्पर्श त्याचाही मला
तुझी आठवण देतो
स्पर्शाने आज तुझ्या
झोप माझी उडाली
बघत त्या हाताकडे
रात्र केव्हाच सरली

