झुळूक
झुळूक
हलकेच वाहतो जेव्हा वारा
सुखद स्पर्श करूनी जातो मनाला
अव्यक्त अनुभूती गवसणी घालतात
अगणित त्या क्षणाला
थंड शीतल अशा या झुळूकेचा
शहारा हवाहवासा वाटतो
शरीरावरती जसा मोरपीस अलगद फिरतो
या अनामिक झुळूकेसरशी
स्वच्छंद होऊनी चित्त जेव्हा विहरते
मृगजळ एक जणू हळुवार निर्माण होते
अशा या मृगजळाचे रूपांतर
वादळात व्हायला वेळ लागत नाही
मृदू कोमल भावनांचा तेव्हा उद्रेक सोसवत नाही
वादळ जे घेऊन येते दुःख, निराशा अन् आतंक
येऊनी अचानक अस्वस्थता घरभर पसरवून जाते
सोबत विलक्षण नशेची धुंदीही उतरवून जाते
आणि परिसागणिक झुळूकेचा स्पर्श
अजाणतेपणी तुफानाचे रूप घेते
