ठरवले मनात काही
ठरवले मनात काही
जीवनात कटू प्रसंगांना सामोरे जावून
संसाराला सर्वस्वी मी घेतले वाहून
स्वतःचे अस्तित्व न राहिले बाकी
अंततः मात्र पडले होते एकाकी
गोंधळून गेले शेवटी घडामोडींना पाहून
विचार केला परंतु तटस्थ राहून
भूतकाळ वारंवार माझा अंत पाही
सुखी संसाराचे स्वप्न जळत राही
जुन्या त्या आठवणींना टाकले झटकून
पुन्हा नाही पाहिले मागे वळून
उशिरा का होईना जाग आली
नव्या आयुष्याची पुन्हा सुरुवात झाली
घरेलू हिंसेला नाहक बळी पडून
उज्वल भविष्य निसटत होते हातून
परीक्षेत आता कधीच हरणे नाही
दृढ संकल्प ठरवले मनात काही
