STORYMIRROR

Pratibha Bilgi

Horror Others

3  

Pratibha Bilgi

Horror Others

उगीच भास होतात

उगीच भास होतात

1 min
190

गेल्या काही दिवसांत

जाणिवा शून्य वाटतात

दिसते एक सावली

भयानक स्वप्ने पडतात


भेसूर आवाज घुमतात

क्षणोक्षणी वाढत जातात

चोहीकडचे दृश्य पाहून

हृदयाचे ठोके चुकतात


डोळे सावली शोधतात

भीतीने शहारे येतात

हिम्मत पडते कमी

पावले परत फिरतात


मनाचे खेळ सतावतात

आत खोलवर रुजतात

समजावते स्वतःला किती

उगीच भास होतात


Rate this content
Log in

Similar marathi poem from Horror