फुलू लागल्या भावना
फुलू लागल्या भावना
गुंतवून स्वतःला घेतले
अदृश्य कुंपण निर्मिले
मोहपाश सर्व तोडून
माझ्यात मी जगले
कोमेजून गेल्या आशा
काळोखी प्रत्येक दिशा
रिता मनाचा कोपरा
उदास साऱ्या निशा
अचानक पालटले चित्र
बदलले आयुष्याचे सूत्र
काय केलीस जादू
कोणते आजमावलेस तंत्र
वेळ आपल्या भेटीची
देणगी जणू दैवाची
फुलू लागल्या भावना
झाली जाणीव पूर्णत्वाची

