डोळे मिटून पाहताना
डोळे मिटून पाहताना
सुंदर सरोवराकाठी विसावून
क्षणभर विश्रांती घेताना
निसर्गाचे आभार मानून
नकळत नतमस्तक होताना
हसते मला पाहून
कळी अलगद उमलताना
सूर्योदय होता नभातून
पालवी नवी अंकुरताना
पक्षांची किलबिलाट ऐकून
दिवसाची सुरुवात करताना
अंतर्मन येते भरून
जादुई किमया अनुभवताना
विविध रंग उधळून
आशीर्वाद मज देताना
स्वर्ग आले दिसून
डोळे मिटून पाहताना
