STORYMIRROR

Pratibha Bilgi

Romance

3  

Pratibha Bilgi

Romance

कसे मांडू शब्दात कळेना

कसे मांडू शब्दात कळेना

1 min
133

प्रेम तुझे केलेस व्यक्त 

अगदी सहज, मंद स्वरात 

काय उत्तर देऊ समजेना 

मन बुडाले खोल विचारात


भावना त्याच्या ऐकून अचंबित

उभी होते स्तब्ध, मूर्तिमंत 

कशी तुझी जादू उमजेना 

नकळत माझ्या चालले गुंतत 


शितल चांदण्यांनी केली सोबत 

कायम वसण्या प्रियाच्या हृदयात 

कधीच तुझी झाले साजना 

दिली कबुली लाजून प्रेमात 


दोघे एकमेकांना झालो समर्पित 

जीवन झाले एकरूप प्रीतित

कसे मांडू शब्दात कळेना 

तुझ्या माझ्या नात्याचे गुपित


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance