STORYMIRROR

Pratibha Bilgi

Tragedy Others

3  

Pratibha Bilgi

Tragedy Others

वारा ही स्तब्ध होई

वारा ही स्तब्ध होई

1 min
198

आक्रंद घोर मनाचा ऐकून

आसमंत ही गहिवरून जाई

घाव न दिसणारे पाहून

सांत्वन तो मजला देई


व्रण शरीराचे निघतात भरून

पण मन अशांत राही

घर आंगण रिते होवून

साद न ऐकू येई


पिल्लासाठी ज्या घरटे बांधून

गात होते रोज अंगाई

काळाने केला घात हेरून

कोण म्हणेल आता आई


जावा जीव थकले मागून

त्यालाही नसावी काही घाई

वाईट अवस्था माझी बघून

वारा ही स्तब्ध होई



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy