"अजुन वेळ गेली नाही "
"अजुन वेळ गेली नाही "
आयुष्यावर तीनेही
थोड बोलायला हवं होतं,
जशी ती जळते तसा मीही
जळतो हे कळायला हवं होतं,
उगाच तिने दूर जाण्याचा
हट्ट केला प्रेम जंजाळातुन
आजही जेव्हा बोलते असं
वाटते ती तिथेच आहे जिथं
तिने प्रेम केले अन् त्याचा शेवट केला,
जेव्हा ती विचारते कसा आहेस
बरा आहे एवढचं बोलतो मी
अन् गप्प होऊन माझा शब्द शब्द
ऐकाचा असते तीला पण मलाही
सुचेनासं होतं नेमकं काय बोलाव,
हा दुरावा हा विरह त्या
पर्वताप्रमाणे जो दिसतो
पण कळतं नाही की
हृदयाच्या किती खोलवर
झिरपलेला आहे,
दोघही एकमेकांच्या
तना मनावर अधिराज्य
गाजवणारे,
ती म्हणते किंवा मी म्हणतो
म्हणून सत्ता पालट होईल हे
या जन्मी तरी शक्य नाही,
उगाच ती काहीतरी बोलाव
म्हणून प्रश्न करते की
लग्न करणार आहेस
मी मात्र कोणताही विचार न
करता हो म्हणून टाकतो
आणि तिची अवस्था मग
एखाद्या जाळ्यात सापडलेल्या
हरिणी सारखी,
डोळ्यातील अश्रू लपवायचे असतात
तिला कारण सारे निर्णय तिचेच होते,
असं नाही की मी तिला दुखवण्याचा
प्रयत्न करतोय तर
मला प्रत्येक वेळी जाणीव करून
द्यायची असते की तुझ्या लग्नातील
मंगलाष्टकाच्या शेवटच्या कडव्यापर्यंत
अजून वेळ गेली नाही

