STORYMIRROR

Ashwin Chavhan

Tragedy

2  

Ashwin Chavhan

Tragedy

तो काळ वेगळा

तो काळ वेगळा

1 min
433


तू सासरी गेल्यापासुन

तुझ्या गल्लीतला गलबलाट कमी झाला ,

मी स्तब्धपणे पाहत असतो त्या हवेने हलणाऱ्या खिडकीकडे ,


की केव्हा तरी येशील तू

तिला बंद करायला ,

जेव्हा घरावरील झगमगाट

बंद होतो तेंव्हा कळत तू येणार

नाही अन् उघडझाप होणाऱ्या खिडक्या

आता बंद होणार नाही,


मला आधी तुझ्या बा ने समजावले

नंतर मित्रांनी ,

पण मी मला कधीच समजावू

शकणार नाही ,


कारण तू नेहमी म्हणायची

तू नासमज आहेस म्हणून ,


मी तेव्हा ही तसाच होतो

आजही तसाच आहे ,

फक्त तो काळ वेगळा होता

आज काळ वेगळा आहे ,



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy