STORYMIRROR

Ashwin Chavhan

Others

3  

Ashwin Chavhan

Others

गाव

गाव

1 min
1.2K


हंगाम सरताच पाखरे

परत जाती त्यांच्या देशी ,

मग माणसं न परतल्याची

खंत का गावाच्या उराशी ,


दिवाळी दसरा रंग पंचमी

असो पोळा ,

आसवातच विरतो गावातील

माय बापाचा सोहळा ,


गावातील चौका चौकात जिथ

तरूणाई बसायची

तिचं तरूणाई जेरबंद झाली

शहरातल्या दहा बाय दहाच्या खोलीत ,


भविष्या पाई जिवणाची गुलामगीरी

उपभोगत असतात ते दर दिवशी ,

मग वाटत गावातील स्वातंत्र्यच

ओरबडुन नेलं शहरातील झगमगाटानं ,


हि शोकांतीका आहे कृषिप्रधान

भारताची जिथं उभारल्या जातात

मोठ मोठे कारखाने आपली भाकर

परकीयांच्या घश्यात घालुन ,


आजही वसान पडलेल्या

गावांना आस आहे की

हंगाम सरताच पाखरे

परत जाती त्यांच्या देशी ,

मग माणसं न परतल्याची

खंत का गावाच्या उराशी ,


Rate this content
Log in