सांग पोरा
सांग पोरा
सांग पोरा भाकरीत
तुले काय दिसते ,
माह्या सुखासाठी जयलेली
बापाची पाठ दिसते ,
सांग पोरा दिव्या ईकडे
पाहुन काय दिसते ,
संसारासाठी कुडत कुडत
जयनारी माय दिसते ,
सांग पोरा या शासनाकडे
पाहुन तुले काय दिसते ,
हरऐक कास्तकाच्या
गळ्यातील फास दिसते ,
हातावरल्या रेषात
तुले काय दिसते ,
काहीच नाही सर
ईथुन तिथुन सारी
बेकारी दिसते ,
