STORYMIRROR

Ashwin Chavhan

Tragedy

1  

Ashwin Chavhan

Tragedy

प्रेम पत्र

प्रेम पत्र

1 min
452


प्रिये जरी दुभंगल्या वाटा

आपुल्या तरी का येतेस पडझड

झालेल्या हृदयात नकळत

तुझे हक्क सांगायला ,


तू थट्टा तर नाही करत ना मी

मी जिवापाड प्रेम केल्याची ,

कुठं सुखानं जगतोय तू गेल्या

पासुन वाट पाहतोय मरणाची ,


ज्या झाडाखाली आपण बसायचो

ना आज मी तिथ एकटाच बसतो ,

राघू मैनेच जोडपही असायच त्यातला

राघू मला पाहुन रडतो मी त्याला पाहुन रडतो ,


नेहमी प्रेम गित गाणारा तो आज

विरहच जाणवते त्याच्या प्रत्येक किलकारीतुन ,

मग मेंदुला झटका बसतो अन्

अश्रू ऐवजी रक्त येते तुला पाहणाऱ्या डोळ्यातुन ,


माझ आयुष्यही कागदी नावे

सारख झालयं कधी हेलकावे

खात जगाच्या पटलावरुन

वरुन नाहीस होईलं ,


जेव्हा जातो मी आपण जिथे जिथे

जगण्या मरणाच्या शपथा घेतल्या

तर नवे प्रेमी पाहतात मला फिरु फिरु

काय माहित त्यांना या वाटेचा मी जुना वाटसरु ,


हे डोळेही तुला पाहु शकत नाही मी

केंव्हाच ओरबळुन काडले त्यांना तुला पाहु नये म्हणून ,

तुला पत्र वाचायला आवडायची मग

लिहतोय मी पण घश्यात कोंबतो तू वाचू नये म्हणून....



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy