STORYMIRROR

Ashwin Chavhan

Tragedy

3  

Ashwin Chavhan

Tragedy

"चक्रव्युह "

"चक्रव्युह "

1 min
17.2K


अभिमन्युला मला

सांगावसं वाटतयं

मित्रा तू गर्भातचं चक्रव्युह

भेदण्याचं ज्ञान प्राप्त केलसं


पण ते अर्धवट राहिलं

कदाचित तुझ्या आईने

थोळा वेळ निद्रेला

वश केलं असत तर

खरचं तू जिंकला असता ...


मित्रा तू माझ्याकडे बघ

या आयुष्याच्या चक्रव्युहात

मीही अडकलो आहे

माझ्याही पुढ्यात माझे आप्त

आहेत ते वाट पाहतात मी

केव्हा हरतो अन् माझ्या कोवळ्या

मनावर ते कधी वार करतात

मला नेस्तनाबुत करून

माझ्या परिस्थितीवर हसायला ...


माझी आई गर्भातच मला

ह्या जगाशी लढण्याचे बळ

नाही देऊ शकली पण

तिने मला ढकलले या चक्रव्युहात

ते फोडण्या करता ...


तू तरी लढला पण

मी मात्र लढण्याआधीच

पूर्णपणे शरण आलोय

या परिस्थितीला

तरीही मी तुला माझ्या

रक्ताचा मानतो ..


कधी कधी आत्महत्या

हा मार्ग मला खूप जवळचा

वाटतो त्याला असलेल्या

व्यसनाच्या पायवाटा

मी माझ्या जगण्याच्या

तत्वामुळे झाकून टाकल्या


पण आत्महत्येमुळे माझा

एकट्याचा प्रश्न सुटेल मी

गेल्यानंतर जे हजार प्रश्न

जन्म घेतील त्याला कोणी सामोरे

जायच त्या आईने जिने मला जन्म दिला

की त्या बापाने ज्याने माझ्या अस्तित्वासाठी

स्वतःच्या जखमांवर पांघरूण घातले...


मित्रा खरचं रे खरचं ज्यांना मी

आपलं म्हणून जवळं करतो

ते सारे स्वार्थी आहेत

तुझ्या मागे तुझा काका मामा

सर्व होते पण मी मात्र

एकटा आहे एकटा

आयुष्याच्या चक्रव्युहात

फसलेला.......


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy