बस ! आज लिहू दे मला
बस ! आज लिहू दे मला


बस ! आज लिहू दे मला
चुकांचे ओझे माझ्या पेलू दे मला
भलत्याच भरल्या होत्या मैफिली
रंगलेले मिश्र शब्द क्षार बघू दे मला
बस ! आज लिहू दे मला
सुकलेल्या पापण्यांची गोष्ट मांडू दे मला
अफवेने उध्वस्त कथेच्या शेवटाला
पडद्यापुढे भांडू दे मला
बस ! आज लिहू दे मला
चुकलेले इशारे कुणाचे ते समजू दे मला
छेडले तुटलेले तार भावना शुन्य माणसाने
समंजस्याने जुडवू दे मला...
बस ! आज लिहू दे मला...