STORYMIRROR

Rahul Jagtap

Abstract

3  

Rahul Jagtap

Abstract

रविवारच तर मिळतो

रविवारच तर मिळतो

1 min
13.2K


सोमवार ते शनिवार

कसरत असते जगण्याची

जरा ही वेळ फुरसत नसते

श्वासाला टाईम प्लिज करण्याची

एक रविवारच तर मिळतो

 

सकाळ होते धावपळीत

दिवस कसा संपतो कळत नाही

रोजचच झालयं असं जगणं

सुर्य डुबता दिसत नाही

एक रविवारच तर मिळतो

 

घराची भिंत अन् खिडकी

आसूसलेली असते भेटीला

पाळण्यात असतं झोपलं बाळ

तरसतं बापाच्या मिठीला

एक रविवारच तर मिळतो

 

सर्कस घडते आयुष्याची

एक दोन हात संघर्षाशी होते

थकून जातो मनुष्य प्राणी

अर्धवट झोपेतून जाग होतो

एक रविवारच तर मिळतो

 

पिकनिक पासून तर खरेदीवर

जोर असतो सुट्टीला

थोडा वेळ द्यावा लागतो

देवालयातल्या भक्तिला

एक रविवारच तर मिळतो

 

उंच्च उंच्च इमारती

त्यात आमचं घरटं छोटसं

लिफ्ट पायरी जाणिव देते

असलं जगणं खोटचं

एक रविवारच तर मिळतो

 

हल्ली धडपडतो कधी

कधी  येत नाही सावरता

हप्ता भराचा पसारा आठवणींचा

एका दिवसात येत नाही आवरता

एक रविवारच तर मिळतो.

 

कसे जगावे आता हा

एक अनसॉल्व्हड क्वेश्शन आहे

आयुष्य विभागलय पदोपदी

कोणता कुणाचा सेक्शन आहे

एक रविवारच तर मिळतो

 

बघू जमेल तसं जमवून घेऊ

धावपळीची नव्याने स्वारी

वाट आहे जगायला पुन्हा

येणार्‍या त्या रविवारी

 

खरच एक रविवारच तर मिळतो..

मुक्तपणे बिनधास्त जगायला

दिवसा नंतर रात्रीला

स्वप्न  उद्याचे मागायला


Rate this content
Log in