हो, आता ती बोलतेय
हो, आता ती बोलतेय


हो,आता ती बोलतेय
मुक्तछंदाने
ती कवितेतून मांडतेय
भावना आनंदाने
जुना होता छेडणारा भुतकाळ
ती वर्तमानात जगतेय
हो, आता ती बोलतेय
कधी तिचेच अर्भक पडून
दिसलेत कचरा कुंडीत
तिच्याभोवती वासनेने
घोंघावणार्या नपुंसक माश्यांना
ती अनुभवतेय
तरी ती राणी झाशीची
बनुन लढतेय
हो, आता ती बोलतेय
पुर्वी ती अडकून होती
रुढी, परंपरतेत
सती पुर्नविवाहाच्या विवंचनेत
तरी ती शिक्षणाने घडतेय
कधी आनंदी कधी सावित्री बनतेय
हो, आता ती बोलतेय
हिरवे रान डोलतेय अन्
गुरे जनावरे तिला बघुन हंबरतेय
खांद्यावर घेऊन नांगर
माती माय राबतेय
हो, आता ती बोलतेय
घेऊन लेखनी स्वयंस्फुर्तीने
लिहितेय आयुष्याची व्यथा
संघर्षाची प्रेरक कथा मांडतेय
नाट्य कादंबर्यातून व्यक्त होतेय
चित्र रेखाटून ममतेचं
कोर्या कागदावर रंग भरतेय
हो, आता ती बोलतेय
जिवनाच्या रंगमंचावर सप्तरंगी
भुमिका तिच्या वाट्याला
खंबिर तिचे पाय अन् मनगटातलं
सामर्थ्य नव चेतना जागवितेय
दुर सारुन अंधार रात्र
ती सुर्याशी मैत्री करतेय
हो, आता ती बोलतेय