कथा
कथा


काल राञी कथा लिहायला बसलो
सुरवात करताचं मनातं हसलो
शब्दाशी आज खेळावे आपण पण,
संकल्पनेच्या गुंतागुंतीतं फसलो
पाञांची जुळवाजुळवं सुरू झाली
एक व्यकतीरेखा डोळयापुढे आली
घटनाक्रम मांडायला लागलो
मध्ये पेन सुद्धा हसण्यासारखा
शाई सोडत होता तर कधी
छोट्या मुलासारखं रडकी हुंदके देत होता
सुख-दूःख , आसू-हसु प्रसंगानुसार सरकत होते,
मलाच पाञांशी मैञी करायला
विनवीत होते., मैञी करावी कां
या पाञांशी माझेचं शब्द मला विचारतं होते
काही पाने लिहताचं पुन्हा पेन थांबला,
हसुन मला म्हणाला ...
तु कश्याला लिहतो आहेस
पाञांच्या भावनांशी
कश्याला खेळतो आहेस
अरे ही फक्त कथा आहे
आयुष्याची व्यथा खुप वेगळी आहे
कल्पना तुझ्या असतील पण् पाञांनी
स्वतहाचं विनलेली घडी आहे
तु फक्त नाममाञ जन्मदाता या
कथेचा.. खरा सुञधार मी आणि
माझ्या शाईचा गंध आहे
आतातरी स्वतहाला सावरं
भावनेच्या पंखांना आवरं
क्षणात मी भानावर आलो
लिहलेली पाने वाचून काढली
काल एक कळलं लिहीतांना
पाञांशी मी जरी खेळतं होतो
पण खर तर कथाचं माझ्या
अस्तित्वाला लिहित होती