बरं ! चल मी आता निघतो
बरं ! चल मी आता निघतो


बरं ! चल मी
आता निघतो
आयुष्याच्या नव्या
प्रवासाला
जूने अनुभव
सोबत आहेत
नवे काही
गोळा करायला
तू नको
गुंतून पडूस
सावरण्या माझा
पसारा
आठवण म्हणून
तसाच
राहू दे तो
अधून मधून करेल
तूझ्याशी संवाद
कसे सुरु आहेत
नव्या आयुष्याशी
दोन हात
काही कडू गोड
येईल वाट्याला
तराजूत तोलुन बघेल
वाटल्यास
तू फक्त तुझी
काळजी घे
मी राहिलो व्यस्त
जरा तरी तू
आठवण दे
कुणी विचारलं माझ्या
बद्दल तर घाबरुन
नको जाऊस
संपतच आलाय
हा शुष्क उन्हाळा
लवकरच येईल पाऊस
बघ पत्र पाठवेल
तूला पत्ता जुनाच
ठेवशील
उगवतं जुनचं नव्याने
नको पेरशील
येतो आता
पुरे करतो बोलनं
नाही तर
आणखी पाय
अडखळतील
चालायचं आहे दूर वर
नकळत पाऊलखुणा
उमटतील...
बरं ! चल मी आता निघतो...