एकांत
एकांत


हवा असतो एकांत
तुला मला अगदी श्वासालाही
दगड विटांशी गप्पा करायला
निर्जिव म्हणजे काय समजायला
हवा असतो एकांत
उगाच उद्याची बात कशाला
आजचं गणित सोडवायला
राहून गेलं धडपडीत सुटलेलं
कोडं सोडवायला
हवा असतो एकांत
मी आणि मी फक्त
आजुबाजूला गजबजलेलं नको
स्विकारायला स्वछंदी मनाला
मोकळ्या सोडलेल्या भावनांशी
एकरुप होण्या क्षणांना
हवा असतो एकांत
देणे घेणे उधारीचे हिशेब
हरवून कागदी कलमा
अर्थकारणाचे फसवे डाव
उधळायला हवा असतो एकांत
कचकचून मिठीत घ्यायला
स्वमग्न स्वप्न बघायला
रात्री सोबत दिवसालाही
मनमुराद लुटायला हवा असतो एकांत...
तुला मला अगदी श्वासालाही
हवा असतो एकांत.....