डेली डायरी -२
डेली डायरी -२

1 min

6.0K
अबोल असतं सारं घराकडे येताना
काहींना लोकल अन् काहींना बसचा धक्का सोसतांना...
दिसतं बाळ पाळण्यात
बाबाच्या नावाचा घास खाऊन निजलेलं
बाबा आला असतो जेव्हा घामाचं अंग घेवून थबथबलेलं
वाढायला घेते ती तेव्हा पोटाला भूक तिच्या केव्हाचीच
लागलेली..
वाट पाहुन दमलेली डोळे ती विस्तारुन रस्त्यावरती तीची बघणारी
झोपी जातो कधीचा दिवसा सजिव हा देह
धडपड जगण्याची असते अशी पोटा अन्न मिळवायची
रोज झालंय, डेली झालंय असे हे जगणे
आयुष्याला गोंजारत सुखाचे स्वप्न मागणे...