डेली डायरी -५
डेली डायरी -५


हॅलो,
अबे...
अरे...
ओय...
कुठं आहेस तू
मेला की, आहे अजून
कॉलेज संपल्यापासून एक कॉल नाही
बॅलन्स नसतं की, वेळेचा बॅलन्स बिघडलाय
व्यस्त झाला एकंदरीत बिझी झालास
ते व्हायला काही हरकत नाही पण,
जरासा वेळ काढून जुन्या मैत्रीच्या
कट्ट्यावर फिरकत नाहीस
हो, आता सेटल झाला असशील चार भिंतीच घर
अन् बायको लेकरं असतील. व्वा ! छान
अबे पण कधी तरी भेटत जा
नव्याने काय शिकलास दुनियादारी
अनुभवाने सांगत जा
हल्ली पैसा आलाय तुझ्या माझ्याजवळ
पूर्वी कसे मोजके पैसे खर्चायचो
एका प्लेट मधली पाणीपुरी अॅडजेस्ट करुन खायचो
असो चल तू बरा आहेस ना हेच विचारायचं होतं
जरा तू बोलाव जरा मी ऐकावं
हे बघायचं होतं
आले नेटवर्क तर दाबून बघशील बटनं
मोबाईलची..
नंबर नसेल सेव्ह तर आता नव्याने करुन ठेवशील
भेटू वेळेने योग जुळवला तर त्याच कट्ट्यावर
जिथून सोडला होता दोस्तीचा खेळ अर्ध्यावर...