STORYMIRROR

Mangesh Medhi

Romance

3  

Mangesh Medhi

Romance

नशा

नशा

1 min
8.5K


जागवे पहाटे पहाटे सहवास गंध स्वप्नी

खुणावे खट्याळ मुखडा दर्पणी सकाळी

बावरा मी वाट धरी बिलगतो भास पाठी


मस्तानी रुपाची वेड्या प्रितीची

जडली मला नशा तुझ्या साथीची तुझ्या साथीची


मधेच स्क्रीन वरती हसते खिडकी पाशी

दिसते मला सारखी अशी अवती भवती

संपवायचे रुटीन तर घुसतो इव्हेंट मधी


मस्तानी रुपाची.....


झाला वेडा-पिसा नाही कामाचा

बसलेला असतो परी हरवलेला दिसतो

म्हणती मला सारे इष्कात वाया गेला


मस्तानी रुपाची....


निभावला कसा बसा दिस बुडलेला असा

भानावर आलो भेटताच तुला

वाटते बसावे पहात तुला


मस्तानी रुपाची....


होऊन जा माझीच येऊ नको स्वप्नात

भास नको प्रत्यक्ष जवळ रहा अशीच

लाभावा पहाटे पहाटे सहवास गंध सहवास गंध


मस्तानी रुपाची वेड्या प्रितीची

जडली मला नशा तुझ्या साथीची तुझ्या साथीची


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance