STORYMIRROR

Shital Yadav

Romance

3  

Shital Yadav

Romance

निरपेक्ष प्रेम

निरपेक्ष प्रेम

1 min
14K


नसावे जगी कुणी प्रेमास पारखे

निरपेक्ष प्रेम राधा कृष्णासारखे


मंजुळ पावा ऐकून मधाळ सूर

बेभान होई मन पाखरासारखे


असती जरी देहाने दोघे वेगवेगळे

समरस झाले जीव क्षितिजासारखे


प्रेमाच्या रंगात असे रंगले मन

सावळबाधेने राधेला ग्रासलेसारखे


जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी कृष्ण

अवघे जीवनच झाले साधकासारखे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance