पारंबी
पारंबी
वेणीत तुझ्या त्या काळ्या
विणल्या असंख्य रात्री
सोड मोकळ्या गाठी
पसरू दे पारंब्यांचे दोर
एक एक गाठ
जशी जाईल सुटत
तशी एक एक पारंबी
राहील झुलत...
मग काय ?
झुलू दे
फुलू दे
वाऱ्या सोबत उडू दे
अंधारात सावल्यांना पहाटभर खेळू दे.
त्या कुणाला दिसणार नाहीत
कुणाला भुलणार नाहीत
तु ही तशीच रहा..