अभंग
अभंग
1 min
323
गाबाळाचे ग्रंथीं कां रे पडां सदा । मिथ्या भेदवादा वागवितां ॥१॥ संसारगाबाळीं पडसी निखळ । जालासी तूं खळ तेणें मना ॥ध्रु.॥साधनसंकटीं गुंतसी कासया । व्यर्थ गा अपाया माजी गुंती ॥२॥निर्मळ फुकाचें नाम गोविंदाचें । अनंतजन्माचे फेडी मळ ॥३॥तुका ह्मणे नको करूं कांहीं कष्ट । नाम वाचे स्पष्ट हरि बोलें ॥४॥
*-तुकोबा*
(गाथा अभंग क्रमांक ३९९५)