पहिले प्रेम...!
पहिले प्रेम...!
काय असतं पाहिलं प्रेम
विसरता विसरत नाही
कधीच कुणाला ते
कधीच मिळत नाही
नकटी शेम्बडी असो
की काळी करूप
की घारी किंवा मिचमीची
नाहीतर चीपचिपी
फरक काही पडत नाही
नजर भिडते प्रेमात पडते
दर्शन घडते सलामी झडते
चिठ्ठी चपाटी होते गाठभेट घडते
आणि घोडे तिथेच अडते
रस्ते फुटतात मार्ग बदलतात
आठवणी धूसर होतात
ओढ पुसट होते पहिले प्रेम
मध्येच दम तोडते आणि
नवीन जीवनाची सुरुवात होते
मिळेल त्यात समाधान
जीवन सरते ठेऊन अवधान
सदा सर्वकाळ मरे पर्यंत सावधान
त्यात बोचते ते पहिले तावदान
पहिलं प्रेम असंच असतं
ते कधी मिळत नसतं
फक्त ते सारखं आठवत असतं
जन्मभर डोळ्यात पाणी साठवत राहत...!

