STORYMIRROR

Raakesh More

Romance Tragedy

4  

Raakesh More

Romance Tragedy

रुसली आहे माझी प्रेयसी

रुसली आहे माझी प्रेयसी

1 min
1.7K

रुसली आहे माझी प्रेयसी

माझ्यावर कधीपासून

वेळ सरकतच नाही माझा

खरंच तिच्यावाचून ||0||


सतत तिची कमी माझ्या

मनाला जाणवताना

स्वप्न वाहतात अश्रूंसोबत

डोळे पाणवताना

दिसत नाही दुःख कोणाला

तूटलोय मी आतून

वेळ सरकतच नाही माझा

खरंच तिच्यावाचून ||1||


धडधड हृदयात वाढत जाते

भीतीच्या स्पंदनाने

बनलंय तिचं हृदय सुंदर

सुगंधी चंदनाने

जागेल माझी आठवण

सुगंधी मनाच्या चंदनातून

वेळ सरकतच नाही माझा

खरंच तिच्यावाचून ||2||


मन तिचं भोळं आहे

थोडीशी ती हट्टी आहे

काय सांगू मित्रा आजकाल

माझ्याशी तिची कट्टी आहे

कशी समजूत काढू तिची

हट्टाच्या चक्रव्यूहातून

वेळ सरकतच नाही माझा

खरंच तिच्यावाचून ||3||


प्रेम तिचं खरंच

झऱ्यासारखं निर्मळ आहे

हृदयात माझ्या फक्त

तिचीच तर तळमळ आहे

प्रेम ओसंडून वाहतंय माझं

भावनेच्या प्रवाहातून

वेळ सरकतच नाही माझा

खरंच तिच्यावाचून ||4||


जन्मोजन्मीची ओढ आहे

नक्की ती येईल

साखरचुंबन देऊन मला

मिठीत ती घेईल

प्रेम केलंय तिच्यावर मी

हृदयाच्या गाभाऱ्यातून

वेळ सरकतच नाही माझा

खरंच तिच्यावाचून ||5||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance