विधवा नारी
विधवा नारी
तू देशाकरिता दिलेस बलिदान
तव आईची कूस उजाडली
चिमण्या पाखरांची जबाबदारी
बघ आता विधवेवर आली//
अभिमान आहे मजसी
देशकारणी देह तव वेची ला
नको घुटमळुस येथे
देईन भक्कम आधार घराला//
तू अससी आठवरूपाने
निरंतर मज जवळी
फोटो समोर राहून बोलते
निवांत रात्रीच्या वेळी //
माय पित्याची काळजी घेईन
सेवा दोघांची करीन
मुलांना करुनी मोठे
देश सेवेसी योग्य बनवीन//
मी राहीन खंबीर उभी
खचणार नाही आता
सर्व सांभाळून करीन
मीही काही देशाकरिता//
