STORYMIRROR

Nilima Natu

Others

3  

Nilima Natu

Others

अशी रूप देवीचे

अशी रूप देवीचे

1 min
11.7K

कशाला जाऊ मी मंदिरी 

मूर्त रूप हे माझ्या घरी//


देवीच्या नाना रूपात नित्य 

 माझी आई मज दिसते हे सत्य//


संसारास लावी हातभार 

लक्ष्मी रूपात नांदते घरभर //


अभ्यास घेता भासे सरस्वती 

करुन घेई अभ्यास पूर्ती//


मज वाटे कधी ती दुर्गामाता 

शासन करते चुकत असता//


नेहमीच असते अन्नपूर्णा 

जेऊ घाली घरास पदार्थ नाना//


संध्याकाळी ती होई शांता 

देवाजवळी दिवा लावता//


माय माझी ती धरणी माता 

विसावते तिच्या मांडीवर आता//


Rate this content
Log in