लेक लाडकी
लेक लाडकी
1 min
24K
माझ्या घरी लेक जन्मली,
गोजिरी इवली सोनपरी!
गोजिरवाणे रुप तिचे,
जणू दिसे गोड तुळसमंजिरी!
पहिली बेटी धनाची पेटी,
आली घरी आनंदले खरोखरी,
छुमछुमती पाऊले इवली,
दुडू दुडू धावती घरभरी!
घालुनी मायेचे शिंपण,
दिधले संस्कारांचे मोती,
कोडकौतुक ही पुरविले,
शिकविली जपण्यासी नाती!
लेक होईल ग मोठी,
होईल पतीची राणी
दोन्ही घरे सांभाळील,
बोलून मंजुळ वाणी!
लेक लडकी या घरची,
जाई सासरी लक्ष्मीच्या पाऊली!
मांगल्य जपेल गृहीचे,
भेटेल पुनः तिथे माऊली!
