जेव्हा लेखणी बोलते
जेव्हा लेखणी बोलते
1 min
12K
मनात उठता काहूर
व्याकुळ मी होते !
अचानक मन माझे शांतवते
जेव्हा लेखणी बोलते!
जेव्हा लेखणी बोलते
शब्द कागदावरी उतरता!
अक्षर वाङमय होते
बोललेले विरूनच जाते!
टिळक,सावरकरांची
जेव्हा लेखणी बोलते
परखडपणे,उघडपणे
शत्रूवरी झोड उठवते!
मनात उठती कोमलभाव
तेव्हा लेखणी हळवी होते,
शब्द उठती कागदावरी
वाचून डोळा पाणी येते!
