व्याकुळले मन
व्याकुळले मन
व्याकुळलेले मन माझे
हाल पाहता जनांचे
सुखात ठेव देवा त्यांना
सुख मज मिळेल साचे ||1||
पावसाची अवकृपा झाली
गावात महापूर आला
आसरा गेला वाहून
दृश्य पाहून अंगी काटा आला
दुष्काळ जेव्हा पडतो
भुईस भेगा पडल्या
अन्नान्न गुरे अन मानव
पाहून जीव गलबलला ||3||
होता धरणी कंप
होत्याचे नव्हते झाले
काही गाडले,झाले बेघर
मन माझे व्याकुळले ||4||
