मैफल रंगली
मैफल रंगली
1 min
11.6K
विद्यादानी सरस्वती
छेडतसे विणातार
हात लीलया फिरती
उमटती सप्त सूर //
ओठी लावून बासरी
फुंकरीने निघे सूर
मुग्ध करी गोकुळास
राधा भुलली नादास //
संवादिनी वाजवता
शब्द शब्द उमटती
गायकाच्या गळ्यातील
सूर सुरात मिळती //
टाळ मृदूंगाचा घोष
दुमदुमे चहुदिशी
वारकरी धन्य होती
दिंडी चालता वारीसी //
डग्गा तबल्याची जोडी
ताल देती संगीतात
सूर,ताल,लय,शब्द
मैफिलीत दंगतात //
