दगड
दगड
हिणवू नका मज
म्हणूनी दगड दगड
ऊन पावसाच्या
कळा सोसल्या रग्गडll
म्हणू नका मज
कोरडा पाषाण
कोसळत्या धारा झेलून
झालो मी हैराणll
म्हणून नका मज
काळा पत्थर पत्थर
रणरणत्या उन्हाने
भेगा पडल्या अंगभरll
नाही माझी कोणती तक्रार
चिडवू नका मज शिला
कोण्या एका माणसाने
देव मानून मज शेंदूर लावलाll
दगडातही असते सौंदर्य
तरतऱ्हेचे रंग असती
दृष्टी हवी बघण्याची
मग रूप ते मना भुलवतीll
