पुन्हा त्या वाटेवर...
पुन्हा त्या वाटेवर...
लागल्यात ठेचा असंख्य पायास कधी नकळत पाय पडलेही त्या काट्यावर
रक्ताळलेले पाय तसाच घेऊन आलो पुढे आता नको जाणे पुन्हा त्या वाटेवर...
किती बांधू चिंध्या जखमेवर त्या एकही कपडा नाही उरला या देहावर
लाही लाही झाली माझ्या स्वप्नांची आता नको जाणे पुन्हा त्या वाटेवर...
नाही संपला प्रवास अजुनही चालतोच आहे तिथून मी
आजवर केला घात वाटेनेच त्या माझा
आता नको जाणे पुन्हा त्या वाटेवर...
आले दगड धोंडे वाटेत काटेही आले
नव्हती तमा त्याची आलो चालून मी त्यावर
खरे काटे ते आपल्यांनीच रोवलेले होते
आता नको जाणे पुन्हा त्या वाटेवर...
किती त्रास मी सहन करावा की असेल तो माझ्या सोबतीलाही
सरणावर झाल्या चुका त्या नकळत होत्या आता नको जाणे पुन्हा त्या वाटेवर...
