स्त्री
स्त्री
नटणे, सजणे तिचा
आहे जन्मजात गुण
जसे फुलते कळी जेव्हा
पडती कोवळं ऊन
वागते स्वैरपणे ती
काय त्यात तिची चुक
पण पुरुषाच्या आत
लपलेली वासनेची भूक
चालताना रस्त्यावरी
लोकांची नजर रोखलेली
असली जरी ती बुरख्याआड
पुरे अंग झाकलेली
काय भरोसा गर्दीत
कुठे लपला दुर्योधन
भितीपायी नेहमी
चिंतेत आहे तिचे मन
असो कोवळी पोर की म्हातारी
नाही सुरक्षित तिचे जीवन
बरा वाटतो उचलून नेणारा परी
कधी स्पर्श न करणारा राक्षस रावण
