STORYMIRROR

Kishor Zote

Tragedy

4  

Kishor Zote

Tragedy

घेवून बिऱ्हाड (अभंग)

घेवून बिऱ्हाड (अभंग)

1 min
419

लॉकडाऊन ते | झाले रात्रीतून |

ते बातमीतून I समजेना ॥ १ ॥


कोरोना आलाय | कसा भारतात I

सारे बोलतात | एक मुखी ॥ २ ॥


रोखण्या उपाय | सांगा काय केले I

असे कसे झाले | मार्ग बंद ॥ ३ ॥


परदेशी सारे | विमानाने आले |

आपलेच झाले | परागंदा ॥ ४ ॥


घेवून बिऱ्हाड | रस्त्याने चाललो |

डोळ्यांनी भिजलो | एकटाच ॥ ५ ॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy