आभास हा
आभास हा
आभास हा छळतो मला,
होतास तु माझ्या सखा बनुनी.
गेलास तु का जीव का लावूनी.
जीव हैराण हा झाला शोधुनी. ।।१।।
क्षणोक्षणी होतो का आभास हा,
आठवणीत माझा असतोस तूच.
जीव हा माझा कासावीस होऊन,
शोधत बसतो सारखे तुलाच.।।२।।
संदेश हा काळ घेऊनी आला.
देशासाठी लढता प्राण हा गेला.
जाण्याआधी सर्वांची हौस तु पु-या केल्यास.
आभास हा होतो, पुन्हा मी येतो बोलून गेलास.।।३।।
मी राहीले उभी, आकांतात झुरण्याचे सोडून.
मीच आता लेक अन बाबा होईन.
आम्हाला हसताना पाहशील तूरे.
अर्ध राहिलेले स्वप्न, मीच करीन पूरे.।।४।।
