आदित्य स्तुती
आदित्य स्तुती
जय सूर्य भगवान
तूच जगत आधार
वेद पुराणी महत्ती
सह्त्र जन्माचा उधार
अनुपम शक्ती ज्याची
तेजोमय बलवान
पूज्य त्रैलोक्य विश्वात
संपन्नता वरदान
भूमंडली उर्जा स्त्रोत
विनाशक दैत्य शक्ती
भक्त सदा अर्ध्य देती
सुखमय फलप्राप्ती
नऊ ग्रहांचा तो राजा
वाढे नेतृत्व सन्मान
जन कल्याणा प्रकाशे
दयाघन महिमान
आरोग्य पुष्टिवर्धन
प्रेम स्पंदनी पहाट
झुंजुमुंजु किरणांची
सप्तरंगी वहिवाट
